Skip to main content

Posts

Language and Identity

When we think of Karnataka, it's often only associated with Kannada. Maharashtra means Marathi. But perhaps the most uncompromising of all is Tamil Nadu, where even the mention of Hindi is unwelcome. These language-based discussions are so common these days. In the midst of all this, a book happened to land in my hands, "Ek Shunya Mee" by P. L. Deshpande. While reading it, I came across a beautiful line. Pu La says, “One who truly loves their own language can love all the languages in the world.” It’s like this, someone who understands a mother’s love can see motherhood in every mother. But looking at the current political narrative around “three-language policy,” “two-language rule,” and sometimes even “only one language,” I wonder are we really in the same country that once proudly spoke of unity in diversity? Or have we lost that country somewhere? “Speak only Kannada in Karnataka,” “Only Tamil in Tamil Nadu,” “Only Marathi in Maharashtra,” …and similar demands in ever...

"भाषा"कारण

 कर्नाटक म्हणजे फक्त कन्नड ( कन्नडा का नाही ते पुढे लिहिलंय)  महाराष्ट्र म्हणजे मराठी पण ह्यात सगळ्यात कट्टर म्हणजे तमिळ तिथे हिंदी चा उच्चार सुद्धा चालत नाही. हे सगळे विषय सतत ऐकू येत असताना, हातात एक पुस्तक आलं, ते म्हणजे "एक शून्य मी" हे पुलंच पुस्तक वाचताना खूप सुंदर ओळ सापडली. पुल म्हणतात की, आपल्या भाषेवर प्रेम करणारा माणूस जगातल्या प्रत्येक भाषेवर प्रेम करू शकतो. म्हणजे आपल्या आईवर प्रेम करणाऱ्याला मातृत्व म्हणजे काय हे कळतं. पण आजकालच्या ह्या राजकारणात ३ भाषा, २ भाषा तर काहीठिकाणी एकच भाषा हा मातृभाषेचा वाद बघितला की वाटत, नक्की आपण त्याच देशात राहतो का की जिथे अनेकतेमधून एकता हा अभिमानाने मान उंचावणारा विषय आहे, की तो देश हरवला?  कर्नाटकात फक्त कन्नड बोला, तामिळनाडू मध्ये फक्त तमिळ ,महाराष्ट्रात फक्त मराठी आणि इतर राज्यात त्यांची त्यांची भाषा! आज कर्नाटक सरकारने सांगितलं की सगळे सरकारी आदेश हे कन्नड मधूनच काढायचे, आणि तुम्हाला काही सरकारी कचेरीत काम असेल तर कन्नड शिका आणि मगच या. आणि जो कन्नडच (कन्नडा नाही) कारण शेवटचा डा हा फक्त हेल काढून बोलायला सोपा जावा म्हणू...

स्त्री और पुरुष

 स्त्री और पुरुष में कुछ तो अलग है,   और यही अंतर कितना सुंदर है।   यह अंतर भेदभाव का संकेत नहीं है, हर किसी की अलग ताकत है, तभी तो जीवन सुखद है।   पुरुष साहसी है, तो स्त्री भी धैर्यवान,   वह उसके पीछे खड़ी रहती है, ताकि न लड़खड़ाए उसका सम्मान। वह भी थकती है, टूटती है, पर कभी हार नहीं मानती,   घर, करियर, ज़िम्मेदारियों में, वह कभी पीछे नहीं रहती।   प्रकृति ने भले ही अलग बनाया हो, पर अवसर समान चाहिए, रास्ते अलग हो सकते हैं, पर मंज़िल की पहचान चाहिए।   वह सहारा देता है, तो स्त्री भी उसकी छाया बनती है,   जब दोनों साथ चलते हैं, तभी राह आसान बनती है।

उन्हाळ्याची सुट्टी

  उन्हाळ्याची सुटी आम्हालाही हवी आहे, वर्षभराच्या थकव्यासाठी महिन्याची तरी रजा हवी आहे. शाळेच्या सुट्टीसारखं नको work from home, वेळ हवाय मोकळा, नको meeting ची बोंब. निवांत हवं जीवन, आणि दुपारीही झोप हवी, खर तर ती शाळेसारखी उन्हाळ्याची सुट्टी हवी. हा लागूदे निकाल १ मे ला तयार आम्ही आहोत, लेखी नसली तरी परीक्षाच असते, हे सर्व जाणून आहोत. अशी सुट्टी मिळाली की उन्हा तान्हा त खेळायला ही खूप ताकत येईल. हरवलेले सोबती जेव्हा खेळायला हाक मारतील, किती मजा येईल?! ससेमिरा नको कामाचा, deadline वगैरे भानगड नको, नको तो AC आणि भली मोठी बिल्डिंग ही नको. दिवसभर खेळून खेळून पोटात जेव्हा कावळे कोकलतील, घरी केलेल्या आमरसाला तेव्हाच खरे तर चव येईल. फ्रिज वगैरे नको काही, थंड माठातल पाणी मिळेल, आइस्क्रीम, पेप्सी नको काही, बर्फाच्या गोळ्यानेच पोट भरेल. बंद ऑफिस च्या दाराकड मग महिनाभर बघणार नाही, काम वगैरे नंतर, लॅपटॉप charging लाही लावणार नाही. देवा एवढच कर,  एक वेळ लहान पण परत नाही दिलेस तरी चालेल, फक्त उन्हाळ्याची सुट्टी दे,  लहान पण आम्हाला आपोआप मिळेल. 🔗 उन्हाळ्याच्या मजेशीर आठवणी इथे वाचा!

वादळवाट

 निळ्या शार आकाशाला जसे ढंगाचे चित्र गोंदले, हिवाळ्याच्या मोसमात अवकाळी मेघ आक्रमिले! कोण सांगेल का झाले, अनोळखीचें आले वारे, ऋतुचक्र बदलून, पार विस्कटून गेले सारे. स्वभाव आहे पावसाचा, कोसळणे सतत आहे, माझ्या मनीचे, गूज सारे, गुंतून आज गेले आहे. काल होता, स्वल्प काळी, माझ्या मनीचा ऋतु हा ही, बदलून गेला थंडवारा, दमट वादळे पाहता ही. शांत कालच्या मंद लाटा, आज तुफानी साथ आहे, तू सांग, तुझ्या मनीची, कोणती वादळवाट आहे.

रहस्य महाकुंभ : भाग १

 हिवाळ्याच्या मंद थंडीत प्रयागराज नगरीत वेगळंच चैतन्य पसरलेलं होतं. महाकुंभच्या निमित्ताने संपूर्ण शहर भक्तिभावाने उजळून निघालं होतं. जिकडेतिकडे भगवे ध्वज फडकत होते, हरीच्या नामस्मरणाचा गजर ऐकू येत होता आणि गंगेच्या पाण्यात भक्तांची गर्दी लोटलेली होती. पत्रकार अमोल पाटील या महाकुंभावर विशेष वृत्तांकन करण्यासाठी आलेला होता. मुंबईच्या एका प्रतिष्ठित वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी असलेल्या अमोलला या सोहळ्याचं संपूर्ण रिपोर्टिंग करायचं होतं—कुंभमेळ्यातील व्यवस्थापन, धार्मिक विधी, साधू-संतांचे प्रवचन, आणि श्रद्धेचा महासागर दाखवणारे दृश्य.   पण यावेळचा महाकुंभ काहीतरी वेगळा वाटत होता. पहिल्याच दिवशी, संध्याकाळच्या वेळी गंगेच्या किनारी फिरताना अमोलचं लक्ष काही साधूंच्या संभाषणाकडे जातं. तो मुद्दाम त्यांच्याजवळ जाऊन ऐकू लागतो.   "यावेळी काहीतरी वेगळं आहे." "गर्दीपेक्षा जास्त काहीतरी आहे इथे." "धर्मस्थळी सावध रहा." अमोलने आधी अनेकदा अशा साधूंच्या गप्पा ऐकल्या होत्या, पण या वेळी त्याला काहीतरी वेगळं जाणवत होतं. त्यांच्या आवाजात एक प्रकारचा तणाव होता. तो पुढे सरकतो आणि एका ...

The Lost and Found at Kumbh

 The year was 2013. The air in Prayagraj was thick with devotion, the scent of burning camphor and marigold flowers blending with the cool breeze from the Ganges. Rajesh and Sunita Jadhav had traveled all the way from Kolhapur, Maharashtra, to witness the grand spectacle of the Kumbh Mela. It was their first time at the sacred gathering, and they had brought their six-year-old son, Gopal, along.   Gopal was a lively, curious child, his small fingers tightly wrapped around his father’s hand as they moved through the endless sea of people. His wide eyes sparkled at the sight of the Shahi Snan procession—sadhus with long, matted hair smeared in ash, majestic elephants draped in saffron cloth, conch shells blowing, and chants rising like waves in the air.   “Aai, look at them!” Gopal’s voice was full of wonder as he pointed toward the Naga sadhus marching fearlessly. Sunita smiled, smoothing his hair. “Yes, beta. They are saints who have renounced everything.” ...

महाकुंभ : एका शोधयात्रेची गोष्ट

प्रयागराज – गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगमावर वसलेले एक पवित्र तीर्थक्षेत्र. २०२५ मधील महाकुंभमेळ्यासाठी संपूर्ण शहर प्रकाशात न्हाल्यासारखे वाटत होते. लाखो भक्त, साधू-संत, पर्यटक आणि शोधक आत्मे या महासंगमात सहभागी होण्यासाठी जमले होते. याच गर्दीत एक तरुण प्रवासी होता – आदित्य, जो स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्यासाठी इथे आला होता. आयटी क्षेत्रातील मोठ्या पगाराची नोकरी, आलिशान आयुष्य आणि सोयी-सुविधांनी भरलेले जग असूनही, त्याच्या मनात सतत एक प्रश्न गोंधळ घालत होता – “मी हे सगळं कशासाठी करतोय?” पहाटेचा पहिला किरण गंगेवर पडला तसे महाकुंभातील हालचालींना वेग आला. आदित्य पहिल्यांदाच अशा भव्य सोहळ्याला हजर होता. अखाड्यांचे साधू, नागा साधूंच्या मिरवणुका, मंत्रोच्चारांचा गजर आणि भक्तांचा जयघोष यामुळे वातावरण भारावून गेले होते. तो गंगेच्या काठावर पोहोचला आणि डोळ्यांसमोरचे दृश्य पाहून थक्क झाला, नागा साधू निर्वस्त्र होऊन ध्यानस्थ होते, काही संत मोठ्या भक्तिभावाने प्रवचन देत होते, काही भक्तगण नदीत स्नान करत होते, तर काही जण केवळ या वातावरणाचा आनंद घेत होते. “हे सगळं मी फक्त टीव्हीवरच पाहि...

बाबा

 कर्तृत्व सगळेच करतात, पण त्याच कौतुक ज्यानी करावं असं वाटत त्या माणसाला कसं सांगायचं याच कोड पडत. आयुष्यभर त्यांनी ज्या कंपनी ची गाडी वापरली, आणि ज्याचं नाव खूप प्रसिद्ध आहे अशा कंपनी मध्ये आपला मुलगा काम करतो हे किती मोठ आहे हे त्यांना कदाचित जास्त जाणवलं असत.  आज ४ जी ४.५ वर्ष झाली, त्यांचा आवाज ऐकायला, त्यांच्या नंबर वरून फोन यायला अजूनही डोळे, हात, कान ,डोकं, अगदी मोबाईल सुद्धा तरसतोय. कोणीही कितीही हक्क सांगावा आपल्यावर पण त्यांचा हक्क कोणाला देता येत नाही.  देव कधी कधी आपल्याला खूप कठीण प्रश्नावर उत्तर शोधायला लावतो. परीक्षेत out of syllabus काही प्रश्न आले तर त्याचे grace mark मिळतात पण आयुष्यात जे out of syllabus प्रश्न येतात त्यावर कोणतीच सवलत मिळत नाही.  भल्या मोठ्या घरातून थेट आपल्याला गेट च्या बाहेर उभा केलं जात आणि सांगितलं जात की आता ह्याची राखण तू करायची. घरात राहणाऱ्या प्रत्येकाची देखभाल करायची, नवीन कोणी आलं तर त्यालाही जमवून घ्यायचं, आता ह्या घराच छत तू व्हायचं.  ह्याच training कुठे मिळत नाही, ह्याच शिक्षण नसत. अगदी phd करा तुम्ही पण ह्याची शि...

रविवारच Subscription

    आज घरात निवांत असताना, अंगणात पडलेल्या धुळीला बघून माझ्या मनात विचार आला की कसं खेळलो ना आपण, ह्या मातीत, ह्या धुळीत. घातलेले कपडे आणि कपड्याच्या आतसुद्धा सगळं धुळीत माखायचं, पण खेळायची धुंदी कमी व्हायची नाही. विष अमृत, डोंगर का पाणी, विटी दांडू आणि कधी कधी क्रिकेट खेळायला कोणता व्हाट्सअॅप ग्रुप लागायचा नाही; नुसती हाक मारली की सगळी हजर. उन्ह वर चढायला लागली की कोणाच्यातरी घरात जायचं, कॅरमवर पावडर फासायची आणि अगदी हाताला कड येईपर्यंत कॅरम बोर्डवर नेम धरायचा. ज्याला क्वीन निघते त्याला कवर कधीच निघत नाही, असं म्हणायचं आणि ओम भगबुगे वगैरे मंत्र टाकायचे, समोरच्याला नेम चुकायला भाग पाडायचं. कॅरमचा डाव अगदीच जास्त खेचला गेला आणि बसून बसून पाय ओ म्हणायला लागले की बाहेर बघायचं आणि परत अंगणात दंगा करायला घुसायचं. तो चालायचा अगदी अंधार पडेपर्यंत, आणि कधीकधी अंधार पडल्यानंतरही. मग तीन-चार घरातल्या आया बाया आपली कार्टी त्या धुरकटलेल्या अंधारातून अचूक शोधून काढायच्या आणि पाठीत रपारप फटके देऊन घराकडे ओढत न्यायच्या. "अभ्यास करत जा की रे कधीतरी, परीक्षेत काय अंगावरची धूळ झटकून येणार काय?...

The night and its magic

The night and its magic, no one awake and nothing tragic! Beneath the velveteen cloak of night, the world is quite and enveloped in glow of moonlight! No footsteps near and no voices around, just the twinkle of stars sky bound! In the night shadows, all secrets are kept, as the world peacefully slept! The night, a paper for dreams to unfurl, where magic happens, in each twirl! Through the silence, the soul takes flight, in the arms of wonderful night. No sorrows, no worries on the way, just the calm mind with the end of day!

गोष्ट

 चला, आज खूप दिवसांनी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, गोष्ट म्हणजे कोणाची गोष्ट? तर ही गोष्ट आहे ती आहे एक घराची.  बेंगलोर मध्ये नव्याने नवीन भागात राहायला आल्यावर येताना जाताना दिसणारे एक छोटंसं जून घर. ज्या पाणीपुरी वाल्याकडे पाणीपुरी खायला जातो त्याच्या दुकानासमोर असलेलं. पाणीपुरी खात खात मी पाहात होतो की, ती जुनी घर असतात ना, तळमजल्यावर दुकान आणि वरती रहण्याजोग्या २-३ खोल्या, छप्पर शक्यतो पत्र्याच असतं बघा तसच हे घर. खाली किरणामालाच आणि सोबतच झेरॉक्स च दुकान आणि दुकानाची भिंत संपली की लागूनच वरती जायला जिना. ते बघता क्षणी माझ्या डोक्यात प्रश्न आला की कशी असेल ही छोटीशी इमारत ती उभी राहिली त्या वर्षात?  नवीन रंग असेल चमकत असेल कदाचित भागामध्ये हीच सुंदर दिसणारी एकुलती एक असेल बहुतेक. आजूबाजूच्या कॉलेज मधल्या विद्यार्थिनी किंवा नवीन बिऱ्हाड करणारे प्रोफेसर? किंवा एका खोलीत एक आणि एका खोलीत एक अशी दोन बिऱ्हाड? मुख्य रस्त्यावरच असल्यामुळे भाडे ही बक्कळ मिळत असेलच मालकाला मग नक्की हे आता बंद का, की फक्त मला बंद वाटतंय लांबून? कदाचित असेल कोणीतरी राहत तिथे असा विचार करत करत ...

शुभ्या

 पू ल म्हणतात की, " काही लोकांची वागण्याची तऱ्हाच अशी असते की त्यांच्या हातात मद्याचा पेला देखील खुलतो " ह्याच काही लोकांच्यात तुझी गणना होते.  " बास की बंगलोर आता या पुण्यात" तू म्हणून म्हणून दमलास पण अजूनही ते जमलं नाही. अजूनही वाटत call करावा आणि पोटभरून शिव्या द्याव्यात तुला.  call केल्यावर कायम " काय साहेब कुठ हाय, काय कुठ पत्ता" अस तू विचारणार आणि मी कायम "हाय की इथच तुम्ही कुठाय पुणे का इस्लामपूर" अस म्हणून वाक्य तोडणार. शाळेत असल्यापासून तुझी मापं काढल्याशिवाय दिवस गेला नाही. तू आणि तुझ logic कायम next level. International tourism and Hospitality Management असा काहीतरी मोठ्या नावाचा course करायला गेलास आणि सुट्टीला samsung चा tab नाचवत यायचास. एकदा असाच मुंबई ला होतास आणि आपल्या "तात्या विंचू fan club" वरती मेसेज टाकलास "मला कसतरी होतंय" ह्या मेसेज वर सगळ्यांनी मिळून काय मापं काढली तुझी... २ दिवसांनी कळलं की तुला admit केलय आणि पांढऱ्या की लाल कोणत्यातरी पेशी कमी झाल्यात. तेव्हा जस गोसवीच्यात admit झालेलास आणि तिथून बर...

लिहितात नक्की कसं?

 काय लिहावं हे जसं सुचाव लागत तसच, कसं लिहावं हे कुठून बाहेरून मिळत नाही, आपल्यातच असावं लागतं. एखाद्या कवितेची ओळ, यमकावाचून अडत असेल तर डोकं खाजवून खाजवून फक्त डोक्यातला कोंडा वाढतो, बाकी यमक मात्र आजूबाजूला कुठेतरी बाहेर सापडत. खुप मोठे मोठे लेखक, मोठमोठे लेख लिहितात, पुस्तक लिहितात, ग्रंथ लिहितात हे कसब येतं कुठून त्यांच्याकडं? कुठून सुचत त्यांना त्याच एका विषयावर लिहायला, कसं सुचत की हाच एक विषय आहे जो थेट वाचकाला भिडेल? म्हणजे मला नाही वाटत की BA किंवा MA करून फक्त तेवढ्यावर असं पुस्तक वगैरे लिहिता येतं असेल. कुठून तरी बाहेरून विचारांचा मालमसाला असल्याशिवाय शिजणारा पदार्थ एवढा accurate जमत नाही. हा पण सुचलेलं सगळं कागदावर मांडायच कसं हा प्रत्येकाचा आपापला बाणा किंवा साध्या भाषेत skill आहे. आमची अजून लेखक म्हणून किंवा atleast एक ब्लॉगर म्हणून काहीच सुरुवात नाही पण तरीही एखादा असा मोजका विषय पकडायला खरंच खूप दिवस वाट पाहावी लागते, मग एक दिवस असा येतो की वाटत लिहावं आणि मग लेखणी, लेखणी? आता लेखणी नाही keyboard म्हणलं पाहिजे, लिहावस वाटत आणि मग हळुंच keyboard मराठी ला स्विच होतो ...

अयोध्या आणि मी

लहान असताना cds सोबत खेळायला आवडायचं काय माहीत का☺️ खेळत असताना एक कोरी CD सापडली, त्याच्यावर कोणतंच नाव नव्हतं लिहिलेलं, मग त्या videocon च्या CD Player वरती ती लावली, Black and white मध्ये काहीतरी विडिओ चालू झाला, त्याला आवाज नव्हता, फक्त विडिओ. माणसं इकडं तिकडं पळत होती, कोणीतरी कुठल्यातरी इमारतीवर चढून बसलेलं, नुसता दंगाच दिसत होता. बाबांना तो व्हिडीओ दाखवला मग बाबा म्हणाले की हा अयोध्येचा आहे.  अयोध्येचा व्हिडिओ? मग तो व्हिडिओ पुन्हा पहिल्यापासून लावला, दादांना दाखवला, दादा म्हणजे माझे आजोबा. दादांनी मग एक एक करून प्रत्येक गोष्ट सांगायला चालू केली. अयोध्येचा नक्की विषय काय, संघर्ष काय आणि निकाल? (तेव्हा अजून निकाल लागायचा होता) प्रत्येक गोष्ट नीट सविस्तर कळली आणि मग घरात एक जुनी विट बाबांनी काढून दाखवली आणि मग म्हणाले "ही विट आयोध्येची, विवेक गेलेला तेव्हा त्याने आणली"  (विवेक म्हणजे माझा काका) विवेक काका कारसेवेला गेलेला? तो होता ती मशीद पाडली तिथे? किती भाग्यवान!  नुसता तोच भाग्यवान नाही तर आपण सगळेच किती भाग्यवान की त्याच्या सहवासात आपण राहतोय. मग विवेक काकाकडून ऐ...

माणूस ओळखायचं गणित

 काहीतरी चुकतंय. माणूस ओळखायला? की माणूस जाणून घ्यायला? कुठेतरी काहीतरी हरवतेय,  मनाच्या कोपऱ्यात शंकांचं काहूर माजतय आणि सैरभैर होऊन चित्त थळ्यावरून हल्लय. काहीच सुचत नाही, कोण कसे आणि कोण कसे... नक्की ओळखायचं तरी कसं? पारखायच कसं की भेटणारा रोज बोलणारा आपला म्हणायचा तो माणूस आपलाच का? काहीतरी वेगळं पाहिजे ना? वेगळी नीती, वेगळी पद्धत? माणसं ओळखायची?? एक टूलकिट वगैरे सारखं म्हणजे कसं माणसं ओळखता येतील. कोणीतरी पुढे येऊन ये करायला पाहिजे, एक पद्धत बनवून सगळ्यांचच कल्याण केलं पाहिजे. कधी कधी कोड च पडत की हा समोर बसलेला माणूस जो आपल्याशी प्रेमाने बोलतोय, आपल्या जवळ येतोय तो नक्की मनातून आपलाच विचार करतोय का? आपल्याच भल्याचा विचार करतोय की फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतोय? कुठून येतं ते तंत्र जिथे माणसं ओळखायची कला अवगत होती? "बघितल्या बघितल्या मी ओळखलं होत, हा किंवा ही कशी आहे ते" हे बघितल्या बघितल्या ओळखायचं skill येतं कुठून? आणि कसं शिकायचं?  मला पण शिकायचंय, माणसं ओळखायला आणि जश्यास तस वागायला, परिस्थिती बघून पलटी मारणाऱ्या आणि नको तेव्हा इगो मोठा करून फुगून बसणाऱ्या, आ...

आपली पहिली भेट

आठवते का आपली पहिली भेट? प्रथम तुज पाहता, काय सांगू काय झाले, तुझ्या नजरेने काळीज माझे घायाळ केले. नक्की प्रेम म्हणजे काय हे कळण्या आधीच प्रेमात पडलो, तुझ्या ओठांत मिसळत येणाऱ्या शब्दात मी अडकलो. तुला पाहताना जीव वेडावून गेला,  तुझे बोल ऐकताना कान तृप्त झाला! पाहता क्षणी वाटले की हीच ती, माझी life Partner, हिच्यासोबत असेल संसार माझा, कोणालाच नाही ही सर. भेटताना तुला वाटले आवडेन का मी तुला? तुझ्या आयुष्यात मिळेल का जागा मला? पण, तू होकार दिलास आणि सगळच खर झालं. सुख, सुख म्हणजे काय नक्की हे मला दिसलं. तू आणि मी एकच झालो,  तुझ्यासोबत आयुष्याचा सोबती मी झालो. आठवते का आपली पहिली भेट? तीच आठवत आठवत आत्ता, तुझ्यासाठी केलेली, तुझी च ही कविता सुचली.

पाऊस मला म्हणाला एकदा!

पाऊस मला खुणावतोय, म्हणतोय बघ मी कसा आहे, थांबतो का कोणासाठी, मला हवं तस मला हवं तिथं माझा मी पडून जातो. मला नाही बंधन कोणतं, अगदी धरणं फोडू शकतो, पाऊस आहे मी, वाऱ्यासोबत तांडव करू शकतो. मग उडते तारांबळ सबंध पृथ्वी लोकाची, घर, महाल किंवा तुमची फॅक्टरी पर्वाच नाही कशाची. रौद्र रूप पावसाचे पाहून मीच थोडा बावरा झालो, विषय थोडा गंभीर वाटला म्हणून थोडा थांबलो. अरे हो हो म्हणालो, माहीत आहे तुझा प्रताप, असाच हैराण करून होतोस मधूनच कटाप. बघ थोडी माझीही स्थिती तू जाणून घे, मन दुबळे असेल तरी भाव माझे समजुन घे, नाही बाबा माणसाला अस मनसोक्त उडता येत, कितीही झेपावल तरी नाही तसं सांभाळता येत. जबाबदारीचे दोर असतात पायात बांधलेले, किती ही म्हणलं तरी त्याचे पाश असतात मनाला कसलेले. तुझ सगळं मान्य आहे, तूच निसर्गाचा राजा, आम्ही शुल्लक मानव जीव, आमची हीच सजा!

काय बोलावे

 काय बोलावे मला कळतच नाही, की ऐकावे नुसते ते सुचतच नाही.. अवघे सारे दुःख माझे व्यक्त कधी होत नाही, परक्याच्या ह्या वेदेनेचे अर्थच मुळी समजत नाही... विषय गंभीर तरी बेजार सर्व काही सुन्न सुन्न, उमजत नाही तसं आता बोलावे की ऐकावे हे सुचतच नाही... कोण मजला पाहिले अन बोलले की त्रस्त आहे, माहिती रे त्रस्त मी तरी उपाय कोणी सुचवला एकही नाही! पाहिजे ते पाहिले प्रत्येकाने, दुवा मी जोडवला नाही, पाहिले पण योग्य तो पाठिंबा मज लाभला नाही...! हा की तो, मी पाहूनी थकलो आता, हा की तो, की मी ह्यातच अडकलो आता, संपले नाही जीवन तरी अडखळला प्राण माझा... हाच आहे का प्रसंग, संपते अनंत इथे नाही?

पाडव्याचा महोत्सव

गुढी पाडवा म्हणजे नक्की काय? फक्त गुढी? कडूलिंब, नवीन साडी, उलटा केलेला गडू. आणि एक काठी? पुरणपोळी कि मग आमरास पुरी? पंचपक्वान्न की साधा गोडाचा शिरा.? श्री राम वनवासातून अयोध्येत परत येतात तो दिवस? कि मग ब्रम्ह देवाने ह्याच दिवशी हे विश्व तयार केल म्हणून हा महोत्सव? खर तर निसर्गाच निरीक्षण केल की कळत, का गुढी पाडवा ते. व पू काळे म्हणतात की जगण्याचा महोत्सव करता आला पाहिजे, आणि निसर्गाला जी पालवी फुटते ना त्याचाच असतो हा महोत्सव “गुढी पाडवा”. छोटी छोटी झाडे सुद्धा हिवाळ्यातला कंटाळा होळीत झटकून, चैत्रातल्या नवीन पालवी साठी आतुरतेने वाट बघत असतात. आंब्याची झाडे मोहोराने भरून गेलेली असतात आणि कोकीळ शीळ घालायला चालू झालेला असतो. निसर्गात हे बदल होत असताना मग माणसाने मनांची कात टाकून नवीन संकल्प का करू नयेत? १ जानेवारीला केलेल्या Resolutions पेक्षा हे best नाही का? निसर्गासोबत आपणही नवीन पालवी ओढून घेऊ शकतोच की! पण अश्या सणांना आपल्या आजूबाजूला लोकांच्या वेगवेगळ्या तऱ्हा बघायला मिळतात. त्यात सगळ्यात पुढे असतात ते म्हणजे आदल्या रात्री Whatsapp वर शुभेच्छांचे status ठेवणार...

Social Media